शिवाजी अंबुलगेकर यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील शिवशाहीनगरमधील रहिवासी शिवाजी त्र्यंबकराव जोशी अंबुलगेकर यांचे दि. १९ ऑगस्ट बुधवारी सकाळी १० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, सून, मुलगी,जावई, नातू,भाऊ,भावजय,पुतणे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी रात्री ७ वाजता शांतीधाम स्मशानभूमी गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.कहाळा येथील मल्हारी म्हाळसाकांत संस्थानची त्यांनी अनेक वर्षे निरपेक्ष सेवा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!