दोन दिवसांत दुसरी धक्कादायक घटना; नांदेडच्या शाळांमधील मुलींच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील श्रीनगर भागातील एका शाळेत १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षणाचे मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाळेतच मुख्याध्यापकाकडून विद्यार्थीनी सोबत गैरवर्तन झाल्याच्या आरोपाने शहरात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित १० वर्षीय मुलगी श्रीनगर भागातील प्रतिभा निकेतन शाळेत शिक्षण घेत आहे. हि शाळा अत्यंत शिस्तबद्ध असल्याची ख्याती आहे. शाळेतील ५० वर्षीय मुख्याध्यापकाने तिच्यासोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने आरडाओरड केल्यानंतर हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. घटनेनंतर मुलीच्या पालकांनी भाग्यनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी संबंधित मुख्याध्यापकाविरुद्ध पोक्सो कायद्यासह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, प्रकरणातील संशयित ५० वर्षीय मुख्याध्यापक रवी सोनवणे याला पोलिसांनी अटक केले आहे. घटनेचा सखोल तपास सुरू आहे. याबाबत पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी माहिती दिली. विशेष म्हणजे, नांदेडमध्ये अवघ्या दोन दिवसांत अल्पवयीन मुलींशी संबंधित दुसरी धक्कादायक घटना समोर आल्याने शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शाळा प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, शिक्षक व कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासली जाते का, तसेच शाळेतील सुरक्षा व्यवस्था कितपत सक्षम आहे, असे गंभीर प्रश्न आता पालकांकडून उपस्थित केले जात आहेत. शिक्षणाच्या मंदिरातच विद्यार्थिनी असुरक्षित असल्याचे प्रकार समोर येत असतील, तर शाळा प्रशासनाच्या जबाबदारीवरही कठोर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी निष्पक्ष व कठोर तपास करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी पालक व नागरिकांतून होत आहे. पोलीस निरीक्षक संतोष तांबे याचा व्हिडीओ ….. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-21-at-11.29.56.mp4 Kanthak Suryatal Post Views: 1,290 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लढाई राहुल गांधींची, निष्ठा नेत्यांची? एनडीटीव्ही रिब्रँडिंगवर काँग्रेसमधील अडानी-भक्ती चव्हाट्यावर! पोलीसांवरच एफआयआर? दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर राहुल गांधींचे धरणे आंदोलन; अमित शाह गप्प का?