किनवट (प्रतिनिधी) – किनवट नगरपरिषदेकडून चालविण्यात येणाऱ्या कोंडवाड्यातून जनावरे बेकायदेशीरपणे सोडवून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका व्यक्तीसह दोन अनोळखी इसमांविरुद्ध किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ५ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास जुने नगरपरिषद कोंडवाडा, किनवट येथे घडली. या प्रकरणातील आरोपी बालाजी पांडू मुद्देवाड (वय ३८, रा. गंगानगर, किनवट) व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी संगनमत करून कोंडवाड्यातील जनावरे सोडविल्याचा आरोप आहे. नगरपरिषदेकडून जनावरे सोडविण्यासाठी शासनाने निश्चित केलेला कर भरून अधिकृत पावती घेण्याची सूचना करण्यात आली असता, आरोपींनी शिवीगाळ करून कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यानंतर कोंडवाड्याचे कुलूप तोडून जनावरे घेऊन जात शासकीय कामात अडथळा निर्माण केला, अशी तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी नगरपरिषद किनवट येथील सफाई कामगार व्यंकटेश नरसिंग मुकेनपल्लीवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनवट पोलिस ठाण्यात गु.र.नं. १९५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १३२, १२१(१), ३२४(४), ३५१(१) तसेच संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फडेवार करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 528 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बसवेश्वर चौकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले; धर्माबादमध्ये दुकानफोडी, ४३ हजारांचा ऐवज लंपास नांदेड जिल्ह्यात घरफोडीच्या दोन घटना; तीन लाखांसह पोषण आहार साहित्याची चोरी, अवैध रेती वाहतुकीवरही कारवाई