नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील वाघी रोड परिसरात झालेल्या एका भीषण हल्ल्यात शेख शमीम शेख इसाक यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिर्झा शब्बर बेगला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेचा थरार: मिळालेल्या माहितीनुसार,२१ जून रोजी मध्यरात्रीनंतर शेख शमीम शेख इसाक हे आपल्या एका मित्रासोबत बसलेले असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. सुरुवातीला त्यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यानंतर तलवार व खंजिराने शरीरावर अनेक वार करण्यात आले. या हल्ल्याची तीव्रता इतकी होती की, शेख शमीम यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे दर्गा परिसर आणि संपूर्ण नांदेड शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोपी आणि न्यायालयीन कारवाई: या प्रकरणी पोलिसांनी ३६ वर्षीय आरोपी मिर्झा शब्बर बेग मिर्झा गफ्फार बेग याला अटक केली आहे. शहर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वेंजने, पोलीस अंमलदार सचिन गायकवाड, दिगंबर मुसळे, अंकुश लांडगे, एकनाथ क्षीरसागर आणि सूर्यकांत गीते यांच्या पथकाने आरोपीला न्यायालयात हजर केले. मुख्य न्यायदंडाधिकारी पी. सी. मोरे यांनी आरोपीला दोन दिवस अर्थात ६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, मिर्झा शब्बर बेगला दोन दिवसांपूर्वीच नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेत आणण्यात आले होते आणि त्याबाबतची अधिकृत प्रेस नोट पोलीस विभागाने प्रसिद्ध केली होती. या कालावधीत झालेली चौकशी आणि तपास हा विद्या वाचस्पती मिळवण्यासाठी महत्त्वाचा विषय ठरू शकतो. संबंधित बातमी .. शेख शमीम हत्या प्रकरण: मुख्य सूत्रधार मिर्झा शब्बर बेग पोलिसांच्या जाळ्यात Kanthak Suryatal Post Views: 372 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अकोला अल्पवयीन मुलगी आत्महत्या प्रकरण: फरार पोलीस शिपायाला नांदेड जिल्ह्यातील मारतळा येथून अटक वादग्रस्त धार्मिक संस्थेच्या जमिनीवर प्रस्तावित क्रीडा संकुलाला विरोध; केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी