नांदेड (प्रतिनिधी) – दक्षिण मध्य रेल्वे मुख्यालयाच्या निर्देशानुसार तिकीट तपासणी अधिक प्रभावी करण्यासाठी तसेच तिकीट धारक प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नांदेड विभागात दिनांक 03 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 04:30 ते सायंकाळी 19:30 या कालावधीत व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या विशेष मोहिमेत एका दिवसात विनातिकीट प्रवास, अनियमित प्रवास आणि बुक न केलेले सामान अशा एकूण 1,087 प्रकरणांची नोंद करण्यात आली असून, ₹5,98,335 इतका महसूल वसूल करण्यात आला. ही मोहीम हजूर साहिब नांदेड–आदिलाबाद, हजूर साहिब नांदेड–परभणी–जालना–छत्रपती संभाजीनगर मनमाड, परभणी–परळी वैजनाथ आणि पूर्णा–अकोला या विभागांमध्ये राबविण्यात आली. मोहिमेत 32 तिकीट चेकिंग स्क्वॉड कर्मचारी, 149 तिकीट तपासणी कर्मचारी, 14 स्टेशन तपासणी कर्मचारी, 4 विभागीय वाणिज्य निरीक्षक तसेच 3 रेल्वे सुरक्षा बल (RPF) कर्मचारी सहभागी झाले होते. या दरम्यान 29 गाड्यांची सखोल तपासणी करण्यात आली. 1,087 प्रकरणांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे : • विनातिकीट प्रवास (TWT) : 516 प्रकरणे, महसूल ₹4,04,590 • अनियमित प्रवास (IRT) : 157 प्रकरणे, महसूल ₹1,17,310 • बुक न केलेले सामान (UBL) : 414 प्रकरणे, महसूल ₹76,435 तिकीट तपासणी व्यतिरिक्त अनधिकृत फेरीवाल्यांची 5 प्रकरणे आढळून आली असून त्यांच्याकडून ₹10,000 दंड वसूल करण्यात आला. तसेच अस्वच्छता (लिटरिंग) संबंधित 4 प्रकरणे नोंदवून ₹1,100 दंड आकारण्यात आला. धूम्रपानाशी संबंधित कोणतेही उल्लंघन आढळून आले नाही. मोहिमेदरम्यान प्रवासी तसेच विक्रेते/फेरीवाले यांना जन विश्वास अधिनियमाच्या प्रमुख तरतुदींविषयी समुपदेशन करण्यात आले. यामागील उद्देश जनजागृती वाढविणे तसेच रेल्वे प्रशासन आणि जनतेमध्ये सकारात्मक व सहकार्यपूर्ण संबंध दृढ करणे हा होता. दक्षिण मध्य रेल्वे सर्व प्रवाशांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे, संपूर्ण प्रवासादरम्यान प्रवासासंबंधी योग्य कागदपत्रे जवळ बाळगण्याचे आणि रेल्वे नियमांचे पालन करण्याचे आवाहन करते. विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी, रेल्वे महसूलाचे संरक्षण करण्यासाठी आणि प्रामाणिक प्रवाशांना सुरक्षित, शिस्तबद्ध व आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी अशा व्यापक तिकीट तपासणी मोहिमा नांदेड विभागात पुढेही नियमितपणे राबविण्यात येतील. Kanthak Suryatal Post Views: 800 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड महापालिकेला हरित दणका: गोदावरी प्रदूषणावरून प्रशासनाच्या थोबाडीत सणसणीत चपराक! बोलणाऱ्या मुलींचा रेट लावण्याची नवीन पद्धत ट्रोल आर्मीने आणली