नांदेड (प्रतिनिधी): नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध वाहतुकीविरोधातील विशेष मोहिमेत अर्धापूर पोलिसांनी धाडसी कारवाई करत दोन बोलेरो पिकअपमधून अवैधरित्या वाहतूक करण्यात येणाऱ्या 10 गोवंश जनावरांची सुटका केली. या कारवाईत दोन पिकअप वाहने, दोन चारचाकी वाहने, आठ मोबाईल फोन व अन्य साहित्य असा एकूण 31 लाख 51 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांना गोवंश जनावरांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार अर्धापूर परिसरात सापळा रचून दोन संशयित बोलेरो पिकअप वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान जनावरांना अत्यंत निर्दयपणे बांधून कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय किंवा कायदेशीर परवानगीशिवाय वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. या प्रकरणी अर्धापूर या प्रकरणी आरोपी नावे 1) शेख माजीद शेख आरेफ, वय 39 वर्षे, रा. मदीनानगर, अर्धापूर, ता. अर्धापूर, जि. नांदेड. 2) मिरासाब अब्दुल शेख, वय 31 वर्षे, रा. खुदबेनगर चौरस्ता, देगलूर नाका, नांदेड, जि. नांदेड. 3) शेख सोहेल शेख नसीर, वय 25 वर्षे, रा. मदीनानगर, अर्धापूर, ता. अर्धापूर, जि. नांदेड. 4) उमर सलीम कुरेशी, वय 27 वर्षे, रा. वांगी रोड, परभणी, जि. परभणी. 5) सय्यद शहाबाज सय्यद रेहबर, वय 24 वर्षे, रा. मदीनानगर, परभणी, जि. परभणी. 6) मोहम्मद रिजवान पिता अब्दुल रहमान, वय 29 वर्षे, रा. खुइबेनगर चौरस्ता, नांदेड, जि. नांदेड 7) मोहम्मद शहाबाज पिता मोहम्मद जाफर कुरेशी, वय 19 वर्षे, रा. खुडेबनगर चौरस्ता, देगलूर नाका, नांदेड, जि. नांदेड. 8) अब्दुल फैजान पिता अब्दुल खय्युम कुरेशी, वय 20 वर्षे, रा. इक्बाल नगर, देगलूर नाका, नांदेड, जि. नांदेड या आठ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम 1976, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गोवंश जनावरांची सुरक्षित व्यवस्था करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले तसेच अर्धापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. गोवंशाची अवैध वाहतूक किंवा प्राण्यांवरील क्रूरतेबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा डायल 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 860 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation किन्नर गुरूंची जिगळा येथे भव्य दिव्य आखाड पाणी पूजा व मिरवणुकीचे आयोजन नांदेड जिल्ह्यात तीन ठिकाणी खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे; तीन स्वतंत्र घटनांनी खळबळ