डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे विविध स्पर्धांचे आयोजन नांदेड – शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड येथील बधिरीकरणशास्त्र विभागाच्या वतीने माननीय अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अंगदान जीवन संजीवनी अभियान २०२६ अंतर्गत अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. समाजात अवयवदानाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि अंगदान करा, जीवन वाचवा हा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धा व जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अभियानांतर्गत या वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय,नांदेड येथील विद्यार्थी, निवासी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व पथनाट्य अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत अत्यंत कल्पकतेने या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पोस्टर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अवयवदानाचे महत्त्व, त्याविषयीचे गैरसमज दूर करण्याची गरज आणि एक अवयवदान -अनेक जीवनदान हा संदेश प्रभावीपणे मांडला. रांगोळी व पोस्टर स्पर्धेत आकर्षक कलाकृतींमधून अवयवदानाचा संदेश साकारण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते, हा हृदयस्पर्शी संदेश प्रभावीपणे समाजासमोर मांडण्यात आला. यावेळी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी अवयवदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा असून एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते, असे सांगितले. समाजातील प्रत्येक नागरिकाने अवयवदानाबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. वैद्यकीय विद्यार्थ्यांनी अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन समाजामध्ये अवयवदानाविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन व जनजागृती निर्माण करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावी, असेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांसमवेत अवयवदानाची प्रतिज्ञा घेतली तसेच अवयवदानाची चळवळ समाजात अधिक व्यापक करण्यासाठी सर्वांनी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले. Kanthak Suryatal Post Views: 198 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी नांदेड विभागाचा विशेष तिकीट तपासणी अभियान; 339 विनातिकीट/अनियमित प्रवाशांकडून ₹2.33 लाखांचा महसूल वसूल