नांदेड – येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या १७ व्या वर्षावास काळास आषाढ पौर्णिमेचे औचित्य साधून तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात प्रारंभ करण्यात आला. याबरोबरच त्यांचे शिष्य श्रामणेर भिक्खु शिलधम्मो, भिक्खु श्रध्दानंद, भिक्खु सारिपुत्त, भिक्खु सुबोधी यांचा पहिला वर्षावास अधिष्ठान प्रांरभ करण्यात आला. तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या १७ व्या वर्षावास अधिष्ठान कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. बुद्धगया येथे महाबोधी विहाराच्या भव्य विपश्यना केंद्रामध्ये भदंत डॉ. उपगउप्त महाथेरो आणि भदंत प्रज्ञादीप महाथेरो आणि देशोदेशीच्या १२ भिख्खूंसह महाराष्ट्रातील २३० बौद्ध भिक्षू उपासक उपासिकांच्या उपस्थितीत भदंत पंय्याबोधी थेरो यांची १४ नोव्हेंबर २००९ रोजी ब्रम्हदेश येथील भदंत चंद्रबोधी महास्थवीर यांच्या हस्ते उपसपंदा करण्यात आली होती. पंय्याबोधी यांचा तेव्हापासून अखंड वर्षावास सुरू आहे. आषाढ पौर्णिमेला हा वर्षावास सुरू होऊन आश्विन पौर्णिमेला तो समाप्त होईल. Kanthak Suryatal Post Views: 691 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शांतीदूत परिवारातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात गुरुपौर्णिमेनिमित्य कवी कवयित्रींचे कवितेतून अभिवादन