उमरगा (प्रतिनिधी) – आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून शांतीदूत परिवाराच्या वतीने शनिवार, दि. २५ जुलै रोजी उमरगा चौऱस्ता येथील निसर्गरम्य ओम लॉन्स अँड रिसोर्ट येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेत वृक्षारोपण केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रवीणजी स्वामी, नगराध्यक्ष किरणजी गायकवाड, पंचायत समिती सभापती आकांक्षाताई चौगुले, श्री अग्जप्पा देवस्थान कराळी अग्निबेटचे तेजसनाथ महाराज, वन अधिकारी दिनेश वाघमारे, कृषिभूषण गोविंदरावजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय शांतीदूत परिवाराचे पदाधिकारी प्रा. युसुफ मुल्ला, प्राचार्य सोमनाथ महाजन, गणेश गरुड, नितीन गौरशेट्टी, मधुकर चौधरी, श्याम पाटील, जितेंद्र घोटाळे, ईश्वर मुगळे, संतोष मोहिते तसेच परिवार स्नेही रविंद्र आळंगेकर, कृषी अधिकारी मुरलीधर जाधव, सेवानिवृत्त नगरसेवक शरद पवार, पत्रकार नसीरुद्दीन शेख, अरविंद पवार, कराळी देवस्थानचे ट्रस्टी, श्री व सौ. जाधव (जाजन मुगळी), प्रा. सौ. महाजन ताई, संगीता गायकवाड, ईश्वर आळंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार शांतीदूत परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा सौ. विद्याताई जाधव तसेच मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करत समाजातील प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. तसेच शांतीदूत परिवाराने सामाजिक, पर्यावरणीय व जनजागृतीच्या क्षेत्रात राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करत संस्थेच्या सेवाभावी कार्याचा गौरव केला. कार्यक्रमास नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व शांतीदूत परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरण संरक्षणाचा दृढ संकल्प करत हा वृक्षारोपण उपक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. Kanthak Suryatal Post Views: 544 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शिक्षक और गुरु में बहुत बड़ा अंतर है। धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या १७ व्या वर्षावासास प्रारंभ