नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील जयप्रकाशनगर, असर्जन येथे घडलेल्या शकुंतला प्रकाश दिंकटवार यांच्या हत्येच्या प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, संपत्तीच्या वादातून नातू प्रतिक दिंकटवार यानेच आपल्या आजीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले असून, सध्या तो पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणात प्रतीकाच्या आई-वडिलांविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शकुंतला दिंकटवार यांच्या नावावरील शेती व इतर संपत्ती प्रतिक दिंकटवार यांच्या नावावर होती. मात्र, त्या ही संपत्ती आपल्या मुलीच्या नावावर करण्याच्या तयारीत असल्याची माहिती प्रतिकला मिळाली होती. याच कारणावरून त्याने आजीबद्दल मनात राग धरल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, १५ जुलैच्या रात्री प्रतिक दिंकटवार याने आजीची हत्या केली. रक्ताचे कपडे उचलून मोदी मैदानात टाकले तसेच आजीला यमसदनी पाठवताना आजीने केलेल्या प्रतिक्रामुळे प्रतिकच्या शरीरावर अनेक निशाण आहेत. त्यानंतर संशय टाळण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी घटनेबाबत अनभिज्ञ असल्याचा आव आणत तो घरात आला. मात्र, तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक पुरावे, घटनास्थळावरील माहिती आणि चौकशीच्या आधारे त्याच्यावर संशय व्यक्त केला. सखोल चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, पोलिसांनी स्पष्ट केले आहे की सध्या या हत्येप्रकरणी नातू प्रतिक दिंकटवार हाच आरोपी असून तो पोलीस कोठडीत आहे. संबंधित बातमी .. संपत्तीच्या हव्यासापोटी आईची निर्घृण हत्या; मुलगा व नातू अटकेत Kanthak Suryatal Post Views: 994 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सुनील मोरे प्रकरण: केवळ आत्महत्या नाही तर आपल्या दोन अपत्यांची क्रूर हत्या; समाजाने अंतर्मुख होण्याची गरज! जुन्या मोंढा परिसरातील बेकायदेशीर पार्किंग व हातगाड्यांवर इतवारा पोलिसांची कारवाई; पाच जणांवर गुन्हा