संपत्तीच्या हव्यासापोटी आईची निर्घृण हत्या; मुलगा, सून व नातू अटकेत

नांदेड(प्रतिनिधी)-संपत्तीसाठी मुलानेच पत्नी व मुलाच्या मदतीने आपल्या आईचा खुन केल्याची घटना आज दि.१६ जुलै रोजी शहरातील जयप्रकाशनगर असर्जन येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.

शहरातील जयप्रकाशनगर असर्जन येथील शकुंतला प्रकाश दिंकटवार या महिलेने आपल्या नावावर असलेली काही संपत्ती मुलीच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला होता. याचा राग मनात धरुन मुलगा प्रविण दिंकटवार, सून तृप्ती दिंकटवार व नातू प्रतिक दिंकटवार या तिघांनी मिळून दि.१५ जुलै रोजी रात्री अकराच्या सुमारास शकुंतला दिंकटवार यांचा खुन करुन ते घराबाहेर गेले. दरम्यान सकाळी आईच्या खुनाची माहिती मिळाल्याचा बनाव करुन ते घरी आले. पोलिसांनी त्यांची विचारपूस करताच त्यांनीच शकुंतला दिंकटवार यांचा खुन केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी तातडीने तिघांनाही अटक केली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व फॉरेन्सिक लॅबची टिम देखील घटनास्थळी दाखल झाली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!