नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत किनवट येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विशेष पथकाने धडक कारवाई करत अवैध विदेशी दारूसह मोटारसायकल असा एकूण ₹29,820 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दि. १५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास किनवट येथील शिवाजी चौक परिसरात विशेष पथक गस्त घालत असताना दोन संशयित व्यक्तींना अडवून त्यांची चौकशी व झडती घेण्यात आली. यावेळी त्यांच्याकडे कोणताही वैध परवाना अथवा कागदपत्रे नसताना विक्रीसाठी विदेशी दारूचा साठा बाळगल्याचे निष्पन्न झाले. झडतीदरम्यान रॉयल स्टॅग आणि मॅजिक मोमेंट या ब्रँडच्या विदेशी दारूच्या बाटल्या तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली हिरो सुपर स्प्लेंडर (MH-26-AV-5303) मोटारसायकल जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ₹29,820 इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 170/2026 नोंद करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील संबंधित कलमान्वये पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. Kanthak Suryatal Post Views: 545 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation भोकर येथे तरुणाचा गळा आवळून खून; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा