नांदेड (प्रतिनिधी): जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत सोनखेड पोलिसांनी बेकायदा रेती वाहतुकीवर मोठी कारवाई करत सुमारे ४५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत विना क्रमांकाचा हायवा टिप्पर आणि त्यामधील रेती जप्त करण्यात आली असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सोनखेड-नांदेड मार्गावरील मौ डोरला परिसरात सापळा रचला. यावेळी विना क्रमांकाचा हायवा टिप्पर अडवून तपासणी केली असता, कोणताही वैध परवाना नसताना सुमारे ५ ब्रास रेतीची अवैध वाहतूक होत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी अंदाजे २५ हजार रुपयांची रेती व ४५ लाख रुपयांचा हायवा टिप्पर असा एकूण ४५.२५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चालक ओंकार माणिक उराडे (वय ३५, रा. दगडगाव, ता. लोहा, जि. नांदेड) तसेच वाहन मालकाविरुद्ध सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध गौण खनिज उत्खनन, साठवण किंवा वाहतूक आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी. अशा अवैध कृत्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. Kanthak Suryatal Post Views: 595 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लिंबगाव पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड;राहटी वाळू वर कधी येणार कायदेशीर निर्बंध नांदेड ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; ८ जणांवर कारवाई, दुचाकी आणि मोबाईल असा ५.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त