नवीन नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. शंकरराव चव्हाण अध्ययन केंद्राच्या वतीने डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त एका ‘विशेष व्याख्यानाचे’ आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान १४ जुलै २०२६ (मंगळवार) रोजी
सकाळी ११:०० ते दुपारी १२:३० दरम्यान आयोजित करण्यात आले असून, या कार्यक्रमात ‘मराठवाडा : काल, आज व उद्या’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. ज्ञानेश्वर पवार यांनी दिली आहे.
विद्यापीठाच्याअधिसभा सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. मनोहर चासकर हे भूषवणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून सिंचन प्रकल्पग्रस्त पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी उपाध्यक्ष मा. माधव भंडारी (पुणे) (कॅबिनेट मंत्री दर्जा, महाराष्ट्र राज्य) उपस्थित राहणार असून, ते विषयावर आपले विचार मांडणार आहेत. या निमित्ताने डॉ. शंकरराव चव्हाण यांचा विकासविषयक दृष्टिकोन आणि मराठवाड्यापुढील आजची आव्हाने यांवर चर्चा होणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेच्या अभिवादनाने होणार असून, त्यानंतर कुलसचिव प्रा. ज्ञानेश्वर पवार हे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत करतील. या प्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. अशोक महाजन आणि व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्र चव्हाण हे आपले मनोगत व्यक्त करणार आहेत.
विद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी, मराठवाड्याचे अभ्यासक आणि नागरिकांनी या विशेष व्याख्यानासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यासनाचे समन्वयक प्रा. दिलीप चव्हाण यांनी केले आहे