काळज येथे १५ ते १७ जुलैदरम्यान मोफत सेवा शिबिर;अल्पोपहार, महाप्रसाद, आरोग्य सेवा व पायांची मोफत मसाज सेवा नांदेड : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे पायी जाणार्या वारकर्यांच्या सेवेसाठी माऊली मित्र मंडळ, नांदेड यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील काळज (ता. फलटण) येथे १५, १६ आणि १७ जुलै दरम्यान मोफत सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सेवा हीच ईश्वरभक्ती’या भावनेतून वारकर्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिबिरामध्ये वारकर्यांसाठी सकाळी नाश्ता व चहा, लहान मुलांसाठी व वारकर्यांसाठी दुधाची व्यवस्था, शुद्ध व सात्त्विक महाप्रसाद, तसेच मोफत आरोग्य तपासणी व प्रथमोपचार सुविधा उपलब्ध असतील. आपत्कालीन परिस्थितीसाठी २४ तास रुग्णवाहिका सेवाही सज्ज ठेवण्यात येणार आहे. सलग पायी चालल्यामुळे होणारा शारीरिक थकवा दूर करण्यासाठी सेवाभावी कार्यकर्त्यांकडून अभ्यंग सेवा (फूट मसाज) देण्यात येणार असून, वारकर्यांना आराम मिळावा हा या उपक्रमामागील उद्देश आहे. वारी ही परंपरा नाही तर आमचा श्वास आहे, हा संदेश देत माऊली मित्र मंडळाने सर्व वारकरी बांधवांना या सेवा शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सेवाभावातून हा उपक्रम राबविण्यात येत असून, वारकर्यांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याची भावना मंडळाच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केली. Kanthak Suryatal Post Views: 626 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation स्वारातीम विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उद्या व्याख्यान मेंटेनन्सचा पैसा जातोय कुणाच्या खिशात? ऐन पावसाळ्यापूर्वीच डीपीने पेट घेतला!