१.७५ कोटींचा मुद्देमाल जप्त; बोटी, इंजिने व तराफे जागीच नष्ट नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाविरोधात मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ७५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट केला. या कारवाईत दोन हायवा, दोन लोखंडी बोटी, सात इंजिने, चाळीस तराफे आणि रेती जप्त करण्यात आली. नदीपात्रातील साहित्य बाहेर काढणे शक्य नसल्याने पंचांसमक्ष ते जागीच नष्ट करण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाला मौजे वाहेगाव येथील गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार छापा टाकण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच काही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. कारवाईदरम्यान दोन हायवा (एमएच-२६ सीव्ही-२९८२ व एमएच-०८ डब्ल्यू-८३२९), दोन लोखंडी बोटी, सात इंजिने, चाळीस तराफे व रेती असा एकूण ₹१,७५,५०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी किरण साहेबराव भुरे (रा. बोरगाव तेलंग) व अर्जुन बालाजी पवार (रा. देवणेवाडी तांडा, ता. लोहा) यांच्यासह इतर चार फरार आरोपींविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. अवैध रेती उत्खनन, वाहतूक आणि पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध कठोर कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचा इशारा नांदेड जिल्हा पोलिसांनी दिला असून नागरिकांनी अशा प्रकारची माहिती तातडीने पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 754 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ९१२० तास परदेशात! देशाला काय मिळालं की फक्त काही धन्नासेठांचा फायदा झाला? तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी? ओमानच्या समुद्रात जहाजावर भीषण हल्ला, भारतीय बेपत्ता; इराणच्या नव्या नेत्याचा ‘बदल्याचा’ थरारक इशारा!