उमरी (प्रतिनिधी): तालुक्यातील शिरूर येथील सोलर प्लांटमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३ हजार मीटर पॉलीकेबल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २९ जून २०२६ रोजी सकाळी ११ ते दि. ३० जून रोजी पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. शिरूर येथील सोलर प्लांटला भेट देण्यासाठी गेलेल्या फिर्यादींना प्लांटमधील अंदाजे ३ हजार मीटर पॉलीकेबल चोरीला गेल्याचे आढळून आले. चोरीस गेलेल्या केबलची किंमत सुमारे २ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी शिवाजी बापूराव पवार (वय ४८, रा. भोकर), व्यवसाय – सिक्युरिटी ऑफिसर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७१/२०२६ भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनिरीक्षक आरसाळे हे करीत असून, सोलर प्लांट परिसरातील हालचालींची माहिती तसेच संशयितांचा शोध घेण्याचे काम पोलीसांकडून सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 634 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation इस्लापूर पोलिसांची धडक कारवाई; १.३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त जुन्या भांडणाच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा