नांदेड (प्रतिनिधी)- जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ३ जुलै रोजी रात्री उस्माननगर–नांदेड मार्गावरील हंबर्डे पेट्रोलपंपाजवळील सिडको परिसरात घडली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास आरोपी निखिल गजभारे व त्याच्या अन्य तीन साथीदारांनी संगनमत करून जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीचा मुलगा परमेश्वर उर्फ बबळू नारायण जोधळे याला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर त्याच्या पोटावर व छातीवर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेप्रकरणी प्रतिमा नारायण जोधळे (वय ५१, रा. भीमवाडी, नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८१८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस)-२०२३ मधील कलम १०९, ११८(१), ३(५) तसेच शस्त्र कायदा कलम ४/२५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत असून, गुन्ह्यातील आरोपींपैकी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. Kanthak Suryatal Post Views: 1,181 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सोलर प्लांटमधून अडीच लाखांच्या पॉलीकेबलची चोरी; उमरी पोलिसांत गुन्हा अर्धापूर पोलीस ठाण्याची सूत्रे पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांच्याकडे; जबाबदारीच्या जाणीवेतून कार्याला सुरुवात