नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने तरुण पिढीला व समाजाला नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या संकल्पनेतून N-STOP : नशेला STOP, भविष्याला START! ही विशेष अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शिवाजीनगर पोलिसांनी दातार चौक भाजीमंडई परिसरात कारवाई करत १ किलो २४६ ग्रॅम सुकलेला गांजा (किंमत सुमारे २५,००० रुपये) जप्त केला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भाजीमंडई परिसरात सापळा रचून कारवाई दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी नवी आबादी, शिवाजीनगर येथील दातार चौक भाजीमंडई परिसरात एक व्यक्ती बेकायदेशीररीत्या गांजा विक्रीसाठी बाळगून असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सायंकाळी भाजीपाल्याच्या गाड्याशेजारी सापळा रचून छापा टाकला. यावेळी संशयित इसम मोहम्मद ईसाक पिता मोहम्मद युसुफ (वय ४५ वर्षे, रा. भाजीमंडई, नवी आबादी, नांदेड) याच्या हातातील वायरच्या पिशवीची झडती घेतली असता, त्यात दोन कॅरीबॅगमध्ये १ किलो २४६ ग्रॅम सुकलेला गांजा आढळून आला. पोलिसांनी पंचनाम्यादरम्यान हा मुद्देमाल हस्तगत केला. मुख्य पुरवठादाराचा शोध व कायदेशीर कारवाई पोलीस चौकशीदरम्यान आरोपीने सदर गांजा शंकर उर्फ भोला वाघमारे (रा. जयभीमनगर, नांदेड) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे उघड झाले. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५२५/२०२६, एन.डी.पी.एस. कायद्याच्या (NDPS Act) कलम ८(क) आणि २०(ब)(ii)(ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इरफान सय्यद करत आहेत. या पोलीस पथकाने बजावली कामगिरी ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्येंजने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुरी, पोलीस उपनिरीक्षक इरफान सय्यद, पोलीस अंमलदार संदीप राठोड, आकोसकर, कालो, काकडे, जमीर आणि जोगपेटे यांनी पार पाडली. नागरिकांना पोलिसांचे आवाहन आपल्या परिसरात कोठेही अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक किंवा सेवन होत असल्याचे आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी अथवा डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने जनसंपर्क अधिकारी आशिष सीताराम बोराटे यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 9 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील ३० हजारांचे मंगळसूत्र चोरीला