नांदेड (प्रतिनिधी) –  नांदेडच्या बसस्थानकात बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उपाताई प्रकाश तिडके (वय ५६, रा. माळाकोळी) या २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ३.१० वाजण्याच्या सुमारास नांदेड बसस्थानक येथे बसमध्ये चढत होत्या. यावेळी बसमध्ये मोठी गर्दी असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. या प्रकरणी उपाताई तिडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५८०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार पोहेकॉ. पोहेकर/अक्कमवार हे पुढील तपास करीत आहेत. बसस्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी चोरट्यांकडून प्रवाशांना लक्ष्य केले जात असल्याने नागरिकांनी प्रवासादरम्यान दागिने व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!