भोकर :- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आज दि. २८ जून रोज रविवारी ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रताप चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार भोकर शहरात राबविण्यात आली. नगराध्यक्ष श्रीमान भगवान दंडवे यांचे हस्ते हनुमान मंदिर येथील बूथवर बालकांना पोलिओ लस पाजवून मोहीम सुरुवात करण्यात आली. जिल्हास्तरीय अधिकारी डॉ. विष्णू मलसेठवार यांनी ग्रामीण रुग्णालय भोकर येथील बूथ वर नुकतेच जन्मलेल्या बालकांना पोलिओ लस पाजविली व शहरातील बूथ यांना भेटी दिल्या. वय ०-५ वर्ष वयोगटातील अपेक्षित लाभार्थी ४०१५ पैकी आज ३६९३ लाभार्थी यांना लस पाजविण्यात आली. भोकर शहरात आज २१ बूथ, ३ ट्रांझिट टीम व १ मोबाईल टीम द्वारे मोहीम राबविण्यात आली. सोमवार पासून पुढील ६ दिवस ८ टीम द्वारे आयपीपीआय (गृह भेटी) द्वारे भेट देऊन उर्वरित बालकांना लस पाजवीण्यात येणार आहे असे आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार यांनी सांगितले. आज सदरील मोहीम मध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस, हत्तीरोग कर्मचारी, नर्सिंग कॉलेज विध्यार्थीनी, स्वयंसेवक व ग्रामीण रुग्णालय भोकर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी काम केले. Kanthak Suryatal Post Views: 434 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड ग्रामीण पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई; पाच आरोपींविरुद्ध दोन गुन्हे; ७२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त जागतिक शालेय क्रीडा स्पर्धेत चमकणार खाकी वर्दी! भारतीय पोलीस अंमलदाराची पंच म्हणून निवड