केज (प्रतिनिधी) -केज पोलीस ठाण्याच्या पथकाने पहाटेच्या गस्ती दरम्यान गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर धडक कारवाई करत सात बैलांची सुटका केली असून आयशर वाहनासह 6 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक असद शेख हे चालक पोलीस अंमलदार शिंदे व होमगार्ड यांच्यासह रात्री गस्त घालत असताना 25 जून रोजी पहाटे सुमारे 3.40 वाजता उमरी टोलनाका परिसरात एका आयशर वाहनातून जनावरांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. संशय आल्याने पोलिसांनी वाहन थांबवून चौकशी केली असता चालकाने आपले नाव मोबीनखान शेरखान (वय 47, रा. रोशनपुरा, नेकनूर, जि. बीड) असे सांगितले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सात देशी गावरान गोवंशीय बैल कोंबून नेले जात असल्याचे आढळून आले. जनावरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवाना व कागदपत्रांची मागणी केली असता चालकाकडे कोणतेही वैध कागदपत्र नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वाहन पोलीस ठाणे केज येथे आणून पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. तपासणीत सात देशी गावरान बैलांची अंदाजे किंमत 2 लाख 79 हजार रुपये तर आयशर वाहनाची किंमत 3 लाख 50 हजार रुपये असल्याचे आढळून आले. याप्रमाणे एकूण 6 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी मोबीनखान शेरखान याच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1)(d), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 119 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियमातील कलम 83, 130 व 177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केज पोलीस करीत आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम, पोलीस निरीक्षक स्वप्नील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक असद शेख यांच्या पथकाने केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक नवनीत गावत तसेच अपर पोलीस अधीक्षक सौ. चेतना तिडके यांनी संबंधित पथकाचे अभिनंदन केले आहे. गोवंश तस्करीविरोधात केज पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे तस्करांमध्ये खळबळ उडाली असून परिसरात या कारवाईचे स्वागत होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 523 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड जिल्ह्याचा पाव-पाव किलोचा कारभार आणि एका वजनदार पर्वाचा अंत नांदेडमध्ये दोन घरफोड्या; २.०५ लाखांचा ऐवज लंपास