घराचे कुलूप तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश; वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील गोवर्धनघाट परिसरात घरफोडीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप व कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील रोख रकमेसह एकूण २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गोवर्धनघाट, नांदेड येथील रहिवासी वैशाली रवी डांगे (वय ३५) यांच्या घरात दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ते १० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. चोरट्यांनी घराचे कुलूप व कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील रोख रकमेसह एकूण २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी वैशाली रवी डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात गुरनं. ५४९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१(४), ३०५ प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घरफोडी प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सोनटक्के करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 99 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; घरफोडीत एक लाखांचा ऐवज लंपास, तर हदगावमध्ये चाकूचा धाक दाखवून लूट ऑनलाइन धमकी देत 13 लाख 95 हजारांची फसवणूक