नांदेड – स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या स्वराज्य संकल्पिका माँसाहेब जिजाऊ यांचा १७ जून २०२६ रोजी स्मृतिदिन. कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांच्या खांद्यावर त्यागाची भगवी पताका देणाऱ्या आणि विखुरलेल्या जनमानसांच्या मनामध्ये स्वराज्याचं जनांदोलन उभं करणाऱ्या स्वराज्यप्रेरिका, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या इतिहासाची साक्ष देणारे भव्य स्मारक ‘राजमाता जिजाऊ सृष्टी, नांदेड’च्या रूपाने उभे राहिले आहे. तरी आपल्या जाज्वल्य इतिहास समजून घेण्यासाठी आणि स्मृतिदिनानिमित्त राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी उद्या सकाळी ९:०० ते रात्री १०:०० पर्यंत राजमाता जिजाऊ सृष्टी ,हनुमान गड नांदेड येथे अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने यावे असे आवाहन राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान चे अध्यक्ष अविनाश कदम यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 869 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला; एक जखमी, आरोपी अटकेत जबरी चोरी व वाहनचोरी करणारी टोळी जेरबंद; तीन गुन्हे उघड, १ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त