नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील मालमत्ता विरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत जबरी चोरी, स्नॅचिंग व वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेले पाच मोबाईल फोन आणि एक मोटारसायकल असा एकूण १ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष मोहिमे अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील मालमत्ते विरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी विशेष पथकाची नियुक्ती करून तपास सुरू केला.दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे व त्यांचे पथक गस्त घालत असताना गुप्त बातमीदार मार्फत तीन संशयित व्यक्ती चोरीचे मोबाईल विक्रीसाठी इदगाह परिसराकडे येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सय्यद आरफात सय्यद हुसेन (वय २६, देगलूर नाका, नांदेड), मोहम्मद मतीन उर्फ तंडी मोहम्मद मुजफ्फर (वय २८, देगलूर नाका, नांदेड) आणि शेख आरबाज शेख अजिज (वय २१, इतवारा, नांदेड) यांचा समावेश आहे.चौकशीदरम्यान आरोपींनी मागील दीड ते दोन महिन्यांत विविध ठिकाणी जबरी चोरी व वाहनचोरी केल्याची कबुली दिली. त्यांनी बिलोली-नरसी रस्ता, नरसी-हैदराबाद रस्ता, मुदखेडजवळील परिसर, नांदेड-नायगाव मार्ग तसेच मारतळा गावाजवळील रस्त्यावर नागरिकांना अडवून मोबाईल व इतर साहित्य चोरल्याचे उघड झाले. पोलिसांनी आरोपींकडून विविध कंपन्यांचे पाच मोबाईल फोन आणि एक मोटारसायकल जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत १ लाख १२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमुळे रामतीर्थ पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ७७/२०२६, रामतीर्थ पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ११८/२०२६ तसेच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ६५१/२०२६ हे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. संबंधित आरोपींना पुढील तपासासाठी रामतीर्थ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या यशस्वी कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. Kanthak Suryatal Post Views: 1,014 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation राजमाता जिजाऊ सृष्टी येथे स्वराज्य संकल्पिका जिजाऊ माँ साहेब यांना उद्या अभिवादन कार्यक्रम जुना मोंढा येथील व्यापारी कार्यालयातील गुन्ह्याचा वजीराबाद पोलिसांकडून आरोपीलापोलीस कोठडी