अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोरील बुलेटचा व्हिडिओ व्हायरल; आईस्क्रीम विक्रेते आणि मिक्सरवाल्यांच्या कथित मोदकांची ही चर्चा नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची जबाबदारी असलेल्या वाहतूक शाखेच्या कारभारावर आता वेगळ्याच प्रकारचे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर वाहतूक शाखेने एमएच ३८ एएफ ०१०१ क्रमांकाची बुलेट ताब्यात घेतली. मात्र, कारवाईपेक्षा त्यानंतर बनवलेल्या व्हिडिओचीच चर्चा अधिक रंगू लागली आहे. या व्हिडिओमध्ये बुलेट मालकाला वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्याच्या मागे बसवून चित्रण करण्यात आले. त्यात संबंधित मुलगा ‘झाली रे भाई, थोडी तोडी’ असे म्हणताना ऐकू येतो. आता या तोडीचा नेमका अर्थ काय? हा सहज केलेला संवाद होता की त्यामागे काही वेगळे संकेत आहेत? याचे उत्तर संबंधितांनीच द्यावे. व्हिडिओ करणाऱ्याला या शब्दाचा अर्थ माहीत असेल, तर शहरातील नागरिकही अनभिज्ञ आहेत असे समजायचे का? आणि तोडीचा काही संबंध नसेल, तर एमएच ३८ एएफ ०१०१ या बुलेटवर नेमकी कोणती कारवाई झाली, याचा अधिकृत खुलासा का होत नाही? शहरात आईस्क्रीम विक्रेत्यांशी वाहतूक शाखेचा नेमका काय संबंध? कोण कोणाकडे जाते, कोणाशी संवाद साधते, याबाबतही चर्चा सुरू आहे. त्यात बांधकामासाठी फिरणाऱ्या मिक्सर वाहनांच्या कथित मोदकांचा विषय आणखी गंभीर आहे. एका मिक्सर चालकाच्या म्हणण्यानुसार, पूर्वी दहा मोदके दिले जात होते; आता पंधरा मोदके मागितले जात असल्याची चर्चा आहे. दहाचे पंधरा कसे झाले, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. एकंदरीत, वाहतूक शाखेत सर्व काही आलबेल असल्याचे चित्र रंगवले जात असले, तरी पडद्यामागे काहीतरी वेगळे सुरू असल्याची शंका नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. या आरोपांची सत्यता तपासून संबंधितांनी पारदर्शक खुलासा करणे गरजेचे आहे. कारण वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना नियमांपेक्षा मोदके मोठे ठरू लागले, तर शहरातील वाहतूक व्यवस्था नव्हे, तर विश्वासच जाम होईल! व्हायरल झालेला व्हिडीओ …. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/11/WhatsApp-Video-2026-11-27-at-15.59.40.mp4 Kanthak Suryatal Post Views: 367 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation संघर्ष कितीही मोठा असला तरी माणूसपण टिकले पाहिजे : डॉ. मोहन भागवत ५४ मतांनी पडलेले परिसीमन विधेयक पुन्हा संसदेत! विरोधी पक्षांमधील फुटीचा भाजपला फायदा होणार?