नांदेड (प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहकार्य नगर परिसरात एका व्यक्तीवर जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याची घटना घडली असून या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १५ जून २०२६ रोजी रात्री १२.०५ ते १२.२० वाजण्याच्या दरम्यान सहकार्य नगर रोड, नांदेड येथे ही घटना घडली. युसुफखान चाँदखान पठाण (वय ५०, रा. सहकार्य नगर, नांदेड) याने फिर्यादीसोबत असलेल्या जुन्या रागातून फिर्यादी मेहराजखान मेहबूबखान (वय ५१, रा. पिठूखान नगर, नांदेड) यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या पायावर मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मेहराजखान मेहबूबखान यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१२/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०९ तसेच कलम ४/२५ भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सरावते करीत असून अधिक तपास सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,160 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जूना मोंढा टॉवर मैदानात वृद्धाची ७ हजारांची रोकड लंपास; तिघांविरुद्ध गुन्हा हदगाव येथे नवजात बालकाचा मृतदेह आढळला; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल