नांदेड (प्रतिनिधी)-अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार 2026’ यावर्षी एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश मुरलीधर जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे. फुले-आंबेडकरी चळवळीतील सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैचारिक तसेच कलात्मक क्षेत्रात डॉ. जोशी यांनी निःस्वार्थ भावनेने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पुरस्कार निवड समितीने त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचित्र व सन्मानपत्र (प्रमाणपत्र) असे असून, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. 26 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजता नवीन नांदेड येथील सिडको परिसरात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे Kanthak Suryatal Post Views: 732 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation खून व दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक चंद्रकलाबाई पिराजी झोकदार यांचे निधन