हदगाव (प्रतिनिधी)- हदगाव शहरातील आझाद चौक परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून कपाटातील तब्बल ३ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ जून २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून ते २ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरीची घटना घडली. हदगाव येथील आझाद चौक परिसरात राहणारे शेख शमीन शेख अमीनसाब कुरेशी (वय ५१ वर्षे) यांच्या घरातील कपाटाचे लॉकर अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यामधील ३ लाख रुपयांची रोकड चोरून नेली. या घटनेनंतर शेख कुरेशी यांनी हदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक १८१/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कामाला लागले आहे. घरफोडीच्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बर्गे करीत असून चोरट्यांचा लवकरच माग काढण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. Kanthak Suryatal Post Views: 856 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मुंबईतील बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी नांदेड ग्रामीण पोलिसांकडून जेरबंद लाच खोर मुख्याध्यापकाला ६ जून पर्यंत पोलीस कोठडी