नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील देगलूर नाका परिसरातील हैदरबाग येथे अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजल्यापासून ते दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८.१५ वाजेपर्यंतच्या कालावधीत हैदरबाग, देगलूर नाका, नांदेड येथील फिर्यादी यांच्या घराला लक्ष्य करण्यात आले. अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी काजी सुलतान मोहियोद्दीन ऊर्फ काजी नजीर मोहम्मद शफियोद्दीन (वय ५४, रा. हैदरबाग, देगलूर नाका, नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५(अ), ३३१(३)(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत. शहरातील वर्दळीच्या परिसरात घरफोडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. Kanthak Suryatal Post Views: 12 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation उमाटवाडीत अंदर-बाहर जुगार अड्ड्यावर मुदखेड पोलिसांचा छापा; चौघे जुगारी ताब्यात