नांदेड (प्रतिनिधी)- मुंबईतील निर्मलनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीला नांदेड ग्रामीण पोलिसांनी धाडसी कारवाई करून अटक केली आहे. निर्मलनगर पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा क्रमांक ३३४/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ६५(१), ७४, ७७, ३५१(१) तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद आवेश मोहम्मद गौस मणियार (वय २६ वर्षे, रा. खुदबे नगर, नांदेड) हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. नांदेड ग्रामीण पोलिसांना आरोपी नांदेड येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर नांदेड ग्रामीण पोलिसांनी निर्मलनगर पोलीस ठाण्याच्या पथकाशी समन्वय साधून संयुक्त कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला नांदेड शहरातील एका ठिकाणाहून ताब्यात घेतले. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आरोपीला निर्मलनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, वसंत केंद्रे, समीर अहेमद शेख, शेख नफीस, निर्मलनगर मुंबई येथील पोलीस उप निरीक्षक विजय धुम, पोलीस अंमलदार मयूर भंडारे आणि सागर राठोड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,328 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई; ३ लाखांच्या चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी जेरबंद हदगावमध्ये घरफोडी; कपाटातील ३ लाखांची रोकड लंपास