नांदेड (प्रतिनिधी) – होमगार्ड जवानांनी आपले कर्तव्य निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडावे, असे आवाहन होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव यांनी केले. जिल्ह्यातील पुरुष होमगार्ड जवानांसाठी दि. १९ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या उजळणी प्रशिक्षण शिबिराला बुधवारी त्यांनी भेट दिली. यावेळी जवानांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. केंद्र नायक संतोष जैस्वाल, समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे आणि प्रमुख लिपिक अभिषेक देशमुख यांची यावेळी उपस्थिती होती. संदीप जाधव म्हणाले की, पोलीस दलाला होमगार्ड जवानांचे नेहमीच सहकार्य लाभते. ‘निष्काम सेवा’ हे ब्रीदवाक्य असलेल्या होमगार्ड जवानांनी सेवाभाव आणि शिस्त कायम राखत आपली जबाबदारी पार पाडावी. आगामी काळातही सर्व जवानांनी कर्तव्याप्रती निष्ठा आणि प्रामाणिकपणा जपावा. जवानांना सशस्त्र मानवंदना शिबिरातील होमगार्ड जवानांनी परेड कमांडर तथा वरिष्ठ पलटन नायक बळवंत अटकोरे यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव यांना सशस्त्र मानवंदना दिली. यावेळी त्यांनी जवानांच्या संचलनाचे कौतुक केले. तसेच जवानांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली. विविध विषयांचे प्रशिक्षण उजळणी प्रशिक्षण शिबिरात सहभागी जवानांना पदकवायत, लाठी कवायत, रायफल कवायत, प्रथमोपचार, अग्निशमन, पूर विमोचन आणि आपत्ती व्यवस्थापन आदी विषयांचे प्रशिक्षण दिले जात आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रभावीपणे काम करण्यासाठी जवानांना आवश्यक कौशल्ये शिकविण्यावर या प्रशिक्षणात भर देण्यात येत आहे. शिबिराच्या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक नेहा शिंदे यांनी जवानांना वाहतुकीचे नियम आणि वाहतूक सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्र नायक संतोष जैस्वाल, प्रशासकीय अधिकारी वैशाली डावरे, समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे, प्रमुख लिपिक अभिषेक देशमुख, कनिष्ठ लिपिक पूजा शिंदे, वरिष्ठ पलटन नायक बशिरोद्दीन शेख, वरिष्ठ पलटन नायक बळवंत अटकोरे, हनुमंत देवकते, भारत कंधारे, प्रकाश कांबळे, संतोष चव्हाण, गोविंद चिखलवाड, अतुल इंगोले आदींनी परिश्रम घेतले. Kanthak Suryatal Post Views: 11 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आमची क्षेपणास्त्रे तुम्हाला शोधून काढतील : इराणचा डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा; मध्य पूर्वेतील युद्ध भडकण्याची शक्यता