नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर धडक कारवाई करत सुमारे 2 कोटी 15 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 10 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 31 मे 2026 रोजी रात्री 10.10 वाजण्याच्या सुमारास गंगाबेट शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. आरोपींची नावे बालाजी अशोक सांगळे (रा. बामणी) बळीराम गोवर्धन चव्हाण (रा. लिंबोटी तांडा) अशोक मोरे (रा. सोनखेड) अतुल प्रभाकर गच्चे (रा. जवळा) अनोळखी अनोळखी अनोळखी अनोळखी अनोळखी अनोळखी जप्त मुद्देमाल टाटा कंपनीचा हायवा (MH 26 CH 9400) भारत बेंझ कंपनीचा हायवा (MH 14 MH 8849) ट्रॅक्टर व ट्रॉली दोन मोठ्या लोखंडी बोटी दोन फायबर बोटी 104 ब्रास रेती एक इंजिन कारवाई करणारे अधिकारी ही कारवाई \उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने काम केले. कारवाईत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उपनिरीक्षक बाबुराव चव्हाण,पोलीस अंमलदार अर्जुन मुंडे, संतोष पवार, शेख आसीफ, गवेंद्र सिरमलवार, विष्णू कल्याणकर, शेख जमीर,शिरगिरे तसेच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 648/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(5), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत पुढील तपास सुरू आहे. अवैध गौण खनिज उत्खननाविरोधातील ही नांदेड पोलिसांची मोठी कारवाई मानली जात आहे. कार्यवाहीचा व्हिडीओ .. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/06/WhatsApp-Video-2026-06-01-at-16.09.56.mp4 Kanthak Suryatal Post Views: 963 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लोह्यात प्रशासकीय कार्यालय परिसरात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई; ३ लाखांच्या चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी जेरबंद