खिशात सुसाईड नोट; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट लोहा ()-लोहा शहरातील तहसील, पंचायत समिती, रजिस्ट्री व भूमी अभिलेख कार्यालयांच्या प्रशासकीय परिसरात सोमवारी (१ जून) पहाटे एका इसमाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मारोती पुंडलीक बाचेवाड (वय ४२, रा. निळा) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. प्रशासकीय कार्यालय परिसरात कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी श्रीरामे यांनी पहाटे साडेपाचच्या सुमारास लिंबाच्या झाडाला एका व्यक्तीने गळफास घेतल्याचे पाहिले. त्यांनी तत्काळ तहसीलदार विठ्ठल परळीकर यांना माहिती दिली. त्यानंतर लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनाही घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, तलाठी भूमेश्वर विभुते, महसूल सेवक माधव काकडे तसेच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कुटुंबीयांच्या उपस्थितीत मृतदेह झाडावरून खाली उतरवून लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मारोती बाचेवाड यांना मृत घोषित केले. दरम्यान, मृताच्या खिशात सुसाईड नोट आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 770 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हजारो शेतकऱ्यांनी रेल्वे रोखून धरल्या;मोदी सांगतात शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल झाले खरे काय ? नांदेडमध्ये अवैध रेती उत्खननाविरोधात मोठी कारवाई; 2.15 कोटींचा मुद्देमाल जप्त, 10 जणांवर गुन्हा