मुंबई (प्रतिनिधी)- राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे. राज्य सरकारने महागाई भत्त्याच्या (DA) थकबाकीच्या रकमेबाबत शासन निर्णय जारी केला असून नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील थकबाकी मे 2026 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.वित्त विभागाने 18 मे 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, सातव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. यापूर्वी 25 फेब्रुवारी 2026 रोजी महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून 58 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.सरकारच्या आदेशानुसार, जुलै ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी आधीच देण्यात आली असून उर्वरित नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील थकबाकी आता थेट वेतनासोबत रोख स्वरूपात जमा केली जाणार आहे.या निर्णयामुळे राज्यातील लाखो शासकीय कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या हातात अतिरिक्त रक्कम येणार आहे. संबंधित खर्च नियमित वेतन व भत्त्यांच्या तरतुदीतून भागविण्यात येणार असल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,329 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड महापालिकेत घरकुल आवास योजनांमध्ये मनमानीचा आरोप; गरिबांना चकरा, दादागिरी करणाऱ्यांची कामे झटपट? नायगाव व उस्माननगर येथे घरफोडी; साडेचार लाखांहून अधिक मुद्देमाल लंपास