नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मारहाण, चोरी तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या घटनांप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित प्रकरणांचा तपास पोलीसांकडून सुरू आहे. लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ मे रोजी सकाळी शेतातील पाण्याच्या वादातून दोन जणांनी एका युवकाला शिवीगाळ करून गंभीर मारहाण केल्याची घटना घडली. प्रभाकर ग्यानाजी कल्याणकर व सोनाजी प्रभाकर कल्याणकर (रा. खडकी, ता. नांदेड) यांनी गणेश मारोतराव कदम (वय २६) यास मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची फिर्याद दाखल झाली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सय्यद करीत आहेत. दरम्यान, मरखेल येथे १५ मे रोजी रात्री मंदिरात चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत दानपेटीतील १० ते १२ हजार रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी पुजारी मलिंगप्पा हावयाप्पा मठपती (वय ५६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मरखेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस अंमलदार दोसलवार करीत आहेत. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ मे रोजी एका वाहनात झोपलेल्या चालकाच्या खिशातील ३० हजार रुपयांची रोकड व कागदपत्रे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. शेख अमीर शेख राजासाब (रा. लातूर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस अंमलदार कांबळे करीत आहेत. तसेच हदगाव येथे एस.टी. बसमध्ये एका महिलेने शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे. रुपाली वामनराव बारसे (वय ३९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,062 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ३० लाखांचा गुटखा जप्त; तेलंगणातील चालक पोलीस कोठडीत नायगाव व उस्माननगर येथे घरफोडी; साडेचार लाखांहून अधिक मुद्देमाल लंपास