नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे 16 मे 2026 रोजी रात्री 10 ते 12 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. फिर्यादीचे आई-वडील व भाऊ घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटाचे लॉक तोडले. कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 3 लाख 35 हजार 318 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. याप्रकरणी निरंजन गणपती पोटलवाड (वय 27, रा. कोलंबी ता. नायगाव) यांच्या फिर्यादीवरून नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 119/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 305, 331(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनिरीक्षक तोटेवाड करीत आहेत.
दुसरी घटना उस्माननगर येथे घडली. 16 मे रोजी रात्री 11 ते 17 मे रोजी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान इंडियन बार, उस्माननगर (ता. लोहा) येथे अज्ञात चोरट्यांनी बारच्या पाठीमागील पत्रा वाकवून आत प्रवेश केला. चोरट्यांनी विविध प्रकारच्या दारूच्या बाटल्या, डीव्हीआर मशीन व रोख रक्कम असा एकूण 79 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी अविनाश मधुकरराव कुरुडे (वय 50, रा. बहादरपुरा कंधार, ता. कंधार) यांच्या फिर्यादीवरून उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 103/2026 दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोउपनिरीक्षक गाडेकर करीत आहेत.
दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
