नांदेड दि. 16 फेब्रुवारी :- महाराष्ट्र राज्यातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर 2 वर्ष कालावधीमध्ये नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या सहयाने शासकीय आश्रमशाळेमध्ये अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परिक्षांचे मार्गदर्शन करण्यात येणार असून निवड केलेल्या आश्रमशाळेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत येत असलेल्या शासकीय/अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल व खाजगी तथा मान्यता माध्यमिक शाळा अंतर्गत इयत्ता 11 वी व इ. 12 वीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परिक्षेची तयारी करुन घेण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविल्यास शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा आयटीआय मधील अभ्यासक्रमांना जास्तीत जास्त मुलांना प्रवेश घेणे सोईस्कार शक्य होईल. मुला-मुलींना प्रवेश द्यायची विद्यार्थी संख्या इयत्ता 11 वी सीईटी CET/ जेईई JEE व नीट NEET साठी प्रत्येकी 50 एवढी आहे. त्यानुसार निवड केलेले केंद्र पुढीलप्रमाणे आहेत. नाशिक अपर आयुक्त अंतर्गत आश्रमशाळा शा.आ.शा. बोपेगांव (नाशिक प्रकल्प) मुलांना प्रवेश द्यायची विद्यार्थी संख्या इयत्ता 11 वी CET/JEE- 50 व NEET- 50 एवढी आहे. ठाणे अपर आयुक्त अंतर्गत आश्रमशाळा शा.आ.शा. (शहापूर प्रकल्प) मुलींना प्रवेश द्यायची विद्यार्थी संख्या इयत्ता 11 वी CET/JEE- 50 व NEET- 50 एवढी आहे. अमरावती अपर आयुक्त अंतर्गत आश्रमशाळा शा.आ.शा. गोटेवाडी (प्रकल्प कळमनुरी) मुलांना प्रवेश द्यायची विद्यार्थी संख्या इयत्ता 11 वी CET/JEE- 50 व NEET- 50 एवढी आहे. नागपूर अपर आयुक्त अंतर्गत आश्रमशाळा शा.आ.शा. सिंधीविहीर (वर्धा प्रकल्प) मुलींना प्रवेश द्यायची विद्यार्थी संख्या इयत्ता 11 वी CET/JEE- 50 व NEET- 50 एवढी आहे. याप्रमाणे नमुद अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश प्रशिक्षणाकरीता विद्यार्थ्यांची सर्वसाधारण पात्रता पुढीलप्रमाणे आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अनुसूचित जमातीच्या यादीतील असावा व त्याकरिता प्रवेशावेळी जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 8 लाख रुपये पेक्षा कमी असावे. या चाळणी परिक्षेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी त्याच शैक्षणिक वर्षात १० उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (सदरचा विद्यार्थी 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी मध्ये प्रवेशित असावे.) वरीलप्रमाणे या प्रकल्प कार्यालयाअंतर्गत सर्व शासकीय/अनुदानित आश्रमशाळा/EMRS निवासी शाळेतील अनुसूचित जमातीचे विद्यार्थी व नांदेड जिल्हातील सर्व खाजगी तथा मान्यता प्राप्त माध्यमिक शाळेतील अनुसूचित जमातीच विद्यार्थी असावे. आवेदन पत्र विहीत नमुन्यात व यादी संबधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट जि. नांदेड या कार्यालयात बुधवार 18 फेब्रुवारी 2026 पुर्वी सादर करावेत. विहित नमुन्यात माहिती सादर केलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा माहे मार्च 2026 मध्ये या प्रकल्प कार्यालया अंतर्गत एकुण प्राप्त आवेदनपत्रानुसार शासकीय आश्रमशाळेवर घेण्यात येणार आहे, असे आवाहन किनवटचे सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 700 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बनावट वेबसाईटस, मोबाईल ॲप्स व खोटया ई चालान लिंक पासून सतर्क राहण्याचे आवाहन व्यापार की शरणागती? शेतकरी, स्वाभिमान आणि सार्वभौमत्वाचा सौदा!