नांदेड(प्रतिनिधी)-विश्र्वशांती महायज्ञ तथा पटाभिषेक रजत महोत्सव कार्यक्रमाची सुरूवात शुक्रवारी विश्र्वशांती महायज्ञाच्या पुजेपने करण्यात आली. यासाठी दि.6 रोज शुक्रवारी सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 3 ते 6 या दोन वेळेत पार पडली. यासाठी 216 दाम्पत्यांनी या विश्र्वशांती महायज्ञाची पुजा केली. शुक्रवारी सकाळी 6 ते 8 यावेळेत श्री.विश्र्वाराध्य मूर्तीस लघु रुद्राभिषेक सहस्त्र बिल्लावर्चन करून आरती करण्यात आली. यानंतर सकाळी 8 ते 11 यावेळेत 108 महायज्ञ कुंडीसाठी 108 दाम्पत्यांनी विश्र्वशांती महारुद्र याग स्वाहाकार व आरती यज्ञ यजमान दांपत्यांनी केदार जगद्गुरु यांचा आशिर्वाद घेवून या पुजेसाठी बसलेले होते. यानंतर दुपारी शिवकथा 12 ते 3 यावेळेत पार पडली. याचबरोबर महाप्रसादाचे वाटप या कालावधीत करण्यात आले. यासाठी मोठ्याप्रमाणात भाविक भक्तांनी महाप्रसादासह शिवकथेचाही लाभ घेतला. आजचा पहिलाच दिवस असल्याने जिल्ह्यातील अनेक भागातून मोठ्याप्रमाणात भक्तगणांनी हजेरी लावली होती. यात महिला मंडळाची मात्र मोठ्याप्रमाणात उपस्थिती होती. नांदेड शहरालगत असलेल्या गोपाळचावडी येथे दि.5 फेबु्रवारीपासून विश्र्वशांती महायज्ञ व पटाभिषेक रजत महोत्सवास शोभा यात्रेने सुरूवात झाली. यामध्ये आज दि.6 रोज शुक्रवारी विश्र्वशांती महायज्ञासाठी सकाळी 8 ते 11 या वेळेत प्रथम पुजा 108 दाम्पत्यांकडून करण्यात आली. त्यानंतर दुपारी 3 ते 6 या दुसर्या यज्ञ पुजेसाठी 108 दाम्पत्यांनी पुजा केली. या ठिकाणी मोठ्याप्रमाणात नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्र,कर्नाटका, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यातून भक्तगण मोठ्या संख्येत हजेरी लावत आहेत. स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था येणार्या भक्तगणांसाठी महाप्रसादाची व्यवस्था याचबरोबर बाहेरगावहून येणार्या भक्तगणासाठी राहण्याची व्यवस्थाही या ठिकाणी आयोजन समितीकडून करण्यात आली आहे. यामध्ये सायंकाळी 6 ते 7 यावेळेत श्री.श्री.श्री.1008 जगद्गुरू केदारनाथ भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात धर्मसभा पार पडणार आहे. यासाठी अनेक शिवाचार्य खासदार, आमदार आदी मंडळी उपस्थित राहत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 687 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महापौर पदासाठी भाजपाकडून कविता मुळे तर उपमहापौर पदासाठी दिपकसिंह रावत यांचा अर्ज दाखल भारत रंग महोत्सव २०२६’ मुंबईत ९ ते १३ फेब्रुवारी