नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणुक 10 फेबु्रवारी रोजी पार पडणार आहे. यासाठी आज दि.6 रोज शुक्रवारी भाजपासह कॉंगे्रस-वंचित आणि एमआयएम या पक्षानेही महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पण बहुमताचा आकडा भाजपाकडे असल्यामुळे महापालिकेवर भाजपाचाच महापौर आणि उपमहापौर विराज मान होणार असल्याची औपचारिकता आता बाकी राहिली आहे. नांदेड महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा पहिला महापौर म्हणून सौ.कविता मुळे आणि उपमहापौर म्हणून दिपकसिंह रावत यांच्या गळ्यात माळ पडणार आहे. 81 सदस्य संख्या असणार्या महापालिकेत भारतीय जनता पार्टीकडे 45 सदस्य आहेत. याचबरोबर शिवसेनेच्या 4 सदस्यांनी पाठींबा दिला आहे. यामुळे या पदावर भाजपाचा महापौर आणि उपमहापौर येत्या 10 तारखेला विराजमान होणार. महापौर आणि उपमहापौर पदासाठी पाच-पाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये भाजपाकडून दोन, कॉंगे्रसकडून एक, तर एमआयएमकडून दोन असे पाच महापौर पदासाठी आणि पाच उपमहापौर पदासाठी उमेदवारी दाखल करण्यात आल्या आहेत. यात एमआयएम पक्षाकडून महापौर पदासाठी अश्विनी धोंगडे, भाजपाकडून कविता मुळे यांनी आपले दोन-दोन अर्ज दाखल केले आहेत. तर कॉंगे्रसकडून महेजबीन अब्दुल फईम यांनी एक अर्ज दाखल केला. तर उपमहापौर पदासाठी एमआयएम पक्षाकडून अल्कसेरी सुमय्या मुल्फाषण सरहान अल कसेरी तर भाजपकडून दिपकसिंह रावत यांनी दोन अर्ज तर कॉंगे्रस-वंचित पक्षाकडून राहुल सोनसळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यासाठी आता 10फेबु्रवारी रोजी महापालिकेच्या सभागृहात हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. Kanthak Suryatal Post Views: 781 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अवैध वाळू उपसा प्रकरणात मोठी कारवाई; 54.25 लाखांचा मुद्देमाल जप्त 216 दाम्पत्यांनी केली विश्र्वशांती महायज्ञाची पुजा