नांदेड –शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचे औचित्य साधून, सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता नांदेडच्या शंकरराव चव्हाण सभागृहात भक्ती आणि संगीताचा सुरेख संगम असलेला सकळ सिद्धी गजानन हा अभंग महोत्सव आयोजित केलेला आहे. आधुनिक महिपती संत दासगणू महाराजांच्या गजानन विजय या ग्रंथावर आधारित नांदेड येथील कवी देवीदास फुलारी यांनी 21 अभंग रचले असून दशरथ पुजारी यांच्या शिष्या आनंदी विकास यांनी या प्रारूप अभंगाला संगीतबद्ध केले आहे. या कार्यक्रमाचे निरूपण प्रख्यात निवेदक ॲड गजानन पिंपरखेडे हे करणार आहेत. या रचनांचे लोकार्पण खासदार तथा पूर्व मुख्यमंत्री मा. अशोकरावजी चव्हाण , खा. डॉ. अजित गोपछेडे, अमरनाथ राजुरकर ,डी पी सावंत , राहुल कर्डिले, अबीनाश कुमार, डॉ. महेश कुमार डोईफोडे आणि शंतनु डोईफोडे यांचे उपस्थितीत होणार आहे. या अभंग महोत्सवात साईप्रसाद पांचाळ ,वैभव पांडे ,वर्षा जोशी, विलीना पात्रा हे नामांकित गायक तसेच वादकही सहभागी होणार आहेत. पंकज शिरभाते यांचे व्हायोलिन ,विठ्ठल चुनाळे यांची बासरी आणि विश्वेश्वर कोलंबीकर यांच्या मृदगंधाचा नाद या कार्यक्रमाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. ललित कला प्रतिष्ठानच्या वतीने होणाऱ्या या अभंग महोत्सवास रसिक भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन बालाजी इबितदार आणि राम शेट्टी तुप्तेवार यांनी केले आहे.
More Related Articles
पहिल्या दिवशी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचे उत्साहात मतदान ;२१ एप्रिलपर्यंत चालणार प्रक्रिया
नांदेड : -लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने यावेळी 85 वयोमर्यादा पेक्षा अधिक वय असणारे मतदार व…
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील ज्येष्ठ नागरिकांना घेवून नांदेड येथून पहिली रेल्वे 12 ऑक्टोबर रोजी होणार रवाना
नांदेड :- राज्यातील नागरिकांना देशातील मोठया तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे,…
आरटीओ कार्यालयातील सेवा फेसलेस सुविधेद्वारे
नांदेड,(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेने संप पुकारला आहे. याकाळात नागरिकांना आपले अर्ज…
