चार तासातच सरकारने खुलासा केला नवभारत मीडियामध्ये नुकतीच एक बातमी प्रसारित झाली. त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची तथाकथित हेकडी मोडल्याचा दावा करण्यात आला. यानंतर सोशल मीडियावरही अनेक भडक आणि अतिशयोक्तीपूर्ण हेडलाईन्स झळकल्या. काही ठिकाणी ट्रम्प यांची उगाच बडबड सुरू होती, पण दोन वक्तव्यांमध्येच त्यांची भूमिका बदलल्याचे चित्र रंगवण्यात आले. काही माध्यमांनी असा दावा केला की व्यापार कराराच्या आधीच अजित ढोबाळ यांनी अमेरिकेला स्पष्ट संदेश दिला होता की भारत कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. मात्र, प्रत्यक्षात झालेल्या व्यापार कराराची सविस्तर माहिती अद्याप स्पष्टपणे समोर आलेली नाही. या करारामध्ये नेमक्या कोणत्या अटी आहेत, त्याचा फायदा कोणाला होणार आणि तो भारतीय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे का, याबाबत ठोस माहिती जनतेसमोर आलेली नाही. असेही सांगितले जात आहे की भारतात काही अमेरिकन कृषी उत्पादने येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. परंतु याच वेळी भारतीय कृषी उत्पादनांना अमेरिकन बाजारपेठेत कितपत संधी मिळणार, याबाबत स्पष्ट भूमिका दिसत नाही. भारतातील गहू, सोयाबीन किंवा इतर शेतीमाल अमेरिकेत विक्रीसाठी किती प्रमाणात जाऊ शकतो, याबाबत सरकारकडून ठोस उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांच्या भवितव्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, काही आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी असा दावा केला की अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी भारतासोबत संघर्ष नको, तर सहकार्य हवे असल्याचे मत व्यक्त केले होते. भारताने संघर्ष टाळण्याचा आणि दीर्घकालीन व्यापारासाठी संयम ठेवण्याचा संकेत दिल्याचेही सांगितले गेले. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये प्रत्यक्ष फायदा कोणाला झाला, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. सोशल मीडियावर काही काळ अजित डोभाल यांच्या नावाने भारताने अमेरिकेला ठणकावून सांगितल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या. परंतु त्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की अशा प्रकारची कोणतीही अधिकृत भेट किंवा चर्चा झालेली नव्हती. पीटीआय ने वृत्त प्रसारित केल्याने सोशल मीडियावर फिरणाऱ्या दाव्यांवर संशय निर्माण झाला आणि काही बातम्यांची विश्वासार्हता डळमळीत झाली. दरम्यान, अमेरिकेने भारतावर कर आकारणी वाढवण्याची भूमिका घेतली होती. भारत जास्त कर लावतो आणि रशियाकडून तेल खरेदी करतो, या कारणांवरून अमेरिकेने अतिरिक्त कर लावण्याचा इशारा दिला होता. नंतर काही प्रमाणात कर कपात करण्यात आली असली, तरी पूर्वीच्या पातळीवर ती आणण्यात आलेली नाही. तसेच, दोन्ही देशांमधील व्यापार ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचा दावा करण्यात आला आहे. या संपूर्ण घडामोडीत सरकारकडून ठोस आणि पारदर्शक माहिती समोर न आल्यामुळे जनतेमध्ये संभ्रम वाढला आहे. सोशल मीडियावरील दावे, राजकीय प्रतिक्रिया आणि अधिकृत स्पष्टीकरण यामधील विसंगतीमुळे जनतेचा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तसेच अजित ढोबाल यांचा खोटारडेपणा चार तासातच उघड पडला. कोणी या खोट्या बातम्या वाढल्या होत्या पाहण्याची गरज आहे. यात सर्वात मोठा धक्का ब्लूमबर्ग या वृत्त संस्थेला बसणार आहे. कारण कोणतीही बातमी पडताळणी केल्या शिवाय प्रसिद्ध करीत नाहीत. Kanthak Suryatal Post Views: 712 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार, क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन सोमवारी नांदेड मध्ये सकळ सिद्धी गजानन हा अभंग महोत्सव