नांदेड(प्रतिनिधी)-शिक्षण घेण्यासाठी कंधार तालुक्यातून आलेल्या एका अल्पवयीन बालकाला मारहाण करून चार जणांनी त्याचा मारहाणीचा व्हिडीओ केला आणि तो व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करतो म्हणून त्याच्याकडून 3 हजार रुपये घेतले आणि 20 हजारांची खंडणी मागितली. या घटनेची माहिती देतांना पोलीस अधिक्षक कार्यालयाने मार खाणाऱ्या अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालकाचे नाव दिले आहे. मात्र आरोपीचे नाव लपविले आहे. एका 17 वर्षीय बालकाने दिलेल्या तक्रारीनुसार 26 जानेवारी रोजी रात्री 11.30 वाजेच्यासुमारास आनंदनगर रस्त्यावरील कंधार खिचडी हॉटेलसमोर, विद्युतनगर पाटीजवळ अतिष जाधव, प्रसाद मनुरकर, कृष्णा उर्फ गोटू दंतपल्लीवार आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशा चौघांनी त्याला मारहाण केली. त्याचा व्हिडीओ बनविला त्याच्याकडून 3 हजार रुपये पण घेतले आणि 20 हजार रुपये खंडणी मागून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी बालकाने दिलेल्या तक्रारीनुसार 4 फेबु्रवाी रोजी विमानतळ पोलीसांनी गुन्हा क्रमांक 26/2026 दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक हुसेन अधिक तपास करीत आहेत. या माहितीमध्ये नांदेडच्या पोलीस अधिक्षक कार्यालयाने मारणाऱ्या अल्पवयीन बालकाचे नाव दिले आहे. पण अल्पवयीन आरोपीचे नाव लपविले आहे. मारखाणारा हा पिडीत आहे, तो अल्पवयीन आहे. अशा परिस्थितीत त्याचे नाव सुध्दा उघड करता येत नाही असा कायदा आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,151 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या नवऱ्याला जन्मठेप मावशीच्या मुलीशी अर्थात बहिणीशी लग्न करणारा स्वतःला सनातनी म्हणवतो तो पंडित नेहरूंच्या चारित्र्यावर बोलू शकतो काय !