नांदेड(प्रतिनिधी)-वाळूचे बेकायदा वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडून लोहा पोलीसांनी कार्यवाही केली आहे. अवैध वाळू आणि ट्रॅक्टर असा 3 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल या प्रकरणी जप्त करण्यात आला आहे. दि.2 फेबु्रवारी रोजी रात्री 11 वाजता आणि 3 फेबु्रवारी रोजी मध्यरात्रीनंतर 1 वाजता लोहा पोलीसांनी जामगा शिवनी मारोती मंदिराजवळ दोन ट्रॅक्टर थांबवले. त् यांचे क्रमांक एम.एच.26 सी.पी.4359 आणि एम.एच.26 बी.एक्स 7163 असे आहेत. त्यामध्ये प्रत्येकी 1 ब्रास अवैध वाळू भरलेली होती. पोलीसांनी या प्रकरणी बेटसांगवी ता.लोहा येथील महेश बालाजी वानखेडे (26) आणि ज्ञानोबा संभाजी वानखेडे (32) या दोघांविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. ही कार्यवाही कंधार उपविभागाच्या पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनात कंधारचे पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने, सहायक पोलीस उ पनिरिक्षक प्रभाकर क्षीरसागर, गणपत राठोड आणि अशोक कांबळे यांनी केली. Kanthak Suryatal Post Views: 612 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बिलोली येथे घरफोडले; देगलूरात जबरी चोरी 72 तासात कंधार पोलीसांनी चोरीचा 100 टक्के ऐवज जप्त केला