छत्रपती संभाजीनगर – शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन २०२६ मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या http://mpsc.gov.in व http://mpsconline.gov.inया संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव र. प्र. ओतारी यांनी कळविली आहे. प्रस्तावित वेळापत्रकानुसार सन २०२६ मध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२५, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-२०२५, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२५, महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा-२०२५, महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा-२०२५, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा-२०२५, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा-२०२६, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा-२०२६ व महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा-२०२६ इत्यादी परीक्षा होणार आहेत, असेही कळविण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,014 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दमदार पोलीस उपनिरिक्षक नागोराव कुंडगिर यांच्याकडे आणखी एक आर्थिक फसवणूकीचा गुन्हा मोदी–पुतीनच्या अफाट मैत्रीचा मीडिया आरती सोहळा ;भारत–रशिया संबंध तेच; पण मीडिया वाजवतंय शहनाई!