नांदेड : उमरी–धर्माबाद मार्गावर धावणाऱ्या इंटरसिटी ट्रेनमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रवासादरम्यान झालेल्या वादातून एका तरुणाचा खून झाल्याची माहिती मिळाली आहे. मृत तरुणाचे नाव आतिश हायबते असे असून, तो ट्रेनमध्ये पाण्याच्या बाटल्या विकण्याचे काम करत होता. प्रवासादरम्यान त्याचा एका प्रवाशाशी वाद झाला, आणि हा वाद इतका चिघळला की त्याचा दुर्दैवी अंत झाला. घटनेनंतर ट्रेनमधील प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, प्रवासादरम्यान सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रेल्वे पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली असून, दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. Kanthak Suryatal Post Views: 2,680 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation रेल्वे पोलीसाला चोरी प्रकरणात आता अटक होणार ” कायाकल्प ” कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण रुग्णालय भोकर येथे पिअर असेसमेंट संपन्न