नांदेड (प्रतिनिधी)- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने 10 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 04:30 ते रात्री 20:00 या कालावधीत सर्व तिकीट तपासणी पथकांच्या सक्रिय सहभागातून मोठी तिकीट तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेवर श्री बी. रितेश, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक (DCM)/नांदेड यांनी देखरेख ठेवली. या विशेष तपासणी मोहिमेत 03 रेल्वे सुरक्षा बल (RPF) कर्मचाऱ्यांसह एकूण 31 कर्मचारी सहभागी झाले होते. प्रवाशांनी रेल्वे प्रवास नियमांचे पालन करावे आणि प्रामाणिक प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी 27 गाड्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान एकूण 565 प्रकरणे आढळून आली. त्यामध्ये तिकीटविना प्रवास (TWT) करणाऱ्यांची 315 प्रकरणे, अनियमित प्रवास (IRT) करणाऱ्यांची 44 प्रकरणे तसेच अनबुक्ड सामान (UBL) संदर्भातील 206 प्रकरणांचा समावेश असून, या कारवाईतून एकूण ₹3,24,320 इतकी महसूल वसुली करण्यात आली. ही मोहीम तिकीटविना व अनियमित प्रवासाला आळा घालणे, रेल्वे महसुलाचे संरक्षण करणे आणि प्रामाणिक प्रवाशांना सुरक्षित, सुलभ व आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्याच्या नांदेड विभागाच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचे द्योतक आहे. नांदेड विभाग प्रवाशांना आवाहन करतो की त्यांनी वैध तिकिटासह प्रवास करावा व रेल्वे नियमांचे पालन करावे, जेणेकरून भारतीय रेल्वेची कार्यक्षमता अधिक सक्षम होण्यास हातभार लागेल. Kanthak Suryatal Post Views: 747 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation धनुष्यबाण कोणाचा या बाबत निवडणूक आयोगाच्या निकालाचे केले पोस्टमार्टम दिल्ली दरबार हादरला! संसदेत मतदानाची भीती आणि त्या दोन बिलांचा मास्टर प्लॅन का फसला?