हिंगोली,(प्रतिनिधी)- जिल्हा पोलीस व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 हिंगोली संयुक्त विद्यमाने फिट इंडिया सायकल स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर फिट इंडिया सायकल स्पर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्ण कोकाटे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना , होम डि.वाय.एस.पी. दत्ता केंद्रे, डी.वाय.एस.पी. राजकुमार केंद्रे, डी.वाय.एस.पी. भुसारे , सहाय्यक समादेशक दामनवाड, सहाय्यक समादेशक डी.पी.नरवाडे, सहाय्यक समादेशक एस.एच.पवार, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मोदे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शरद मरे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डोंगरे, सा पो.नि.शिवसांब घेवारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. फिट इंडिया सायकल स्पर्धेला संत नामदेव पोलीस कवायत मैदानाहून सुरुवात करण्यात आली असून ही सायकल रॅली श्री.छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, रिसला बाजार ,अकोला बायपास, खटकाळी बायपास, नांदेड नाका, इंद्रा चौक या मार्गाने पुन्हा संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे संपन्न करण्यात आली. सायकल मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पोलीस प्रशासन राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 12 , तसेच शहरातील इतर नागरिकांनी सहभाग नोंदवाला होता. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2025/08/VID-20250824-WA0029.mp4 Kanthak Suryatal Post Views: 759 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नुकसानग्रस्तांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवू – पालकमंत्री अतुल सावे हिंगोली पोलिसांचा मोठा गौप्यस्फोट – पशुधन चोरी करून नांदेडमध्ये कापले जात असल्याचा पर्दाफाश