नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीसांच्या सायबर विभागाने 160 मोबाईलचे मिसिंग या सदरात पोलीस दलाकडे नोंदविण्यात आले होते. ते मालकांना परत केले आहेत. या मोबाईलची किंमत 20 लाख 53 हजार रुपये आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणावरून, बाजारातून, गर्दीच्या ठिकाणातून अनेक मोबाईल गहाळ होता. याचा शोध नांदेड जिल्हा पोलीस दलातील सायबर विभागाने लावला असून सायबर विभागाचे पोलीस निरिक्षक वसंत सप्रे, पोलीस उपनिरिक्षक एम.बी. चव्हाण, पोलीस अंमलदार राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे, महेश बडगू, कांचन कसबे, रेशमा पठाण, शुभांगी जाधव, जावीद पिडगे, काशिनाथ कारखेडे, व्यंकटेश सांगळे, ज्ञानेश्र्वर यन्नावार, राम शेंडगे यांनी 160 मोबाईल चोरले. या सर्व मोबाईची किंमत 20 लाख 53 हजार रुपये आहे. आज पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या हस्ते हे मोबाईल मालकांना परत देण्यात आले आहेत. नांदेड पोलीसांनी Nanded Police आणि Facebook Page आणि Twitter यावर मोबाईलची माहिती प्रसिध्द केली आहे. आपला IMEI क्रमांक ओळखून सायबर पोलीस ठाणे नांदेड येथून आपला मोबाईल घेवून जाण्याचे आवाहन केले आहे. नांदेडच्या पोलीस अधिक्षकांनी CEIR या पोर्टलवर गहाळ झालेली माहिती अपलोड करण्याचे आवाहन केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,254 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड महानगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रवींद्र संगनवार तर कार्याध्यक्षपदी गजानन कानडे यांची निवड राज्यात 40 पोलीस उपअधिक्षकांना नवीन नियुक्त्या; पाच जणांना बदलून नवीन नियुक्त्या