नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलाने सात आरोपींना पकडून नांदेड जिल्ह्यातील 9 आणि तेलंगणा राज्यातील 4 तसेच वसमत तालुक्यातील 1 असे एकूण 14 गुन्हे उघडकीस आणले असून जवळपास 7 लाख रुपयांचा मुद्देमाल या चोरट्यांकडून जप्त केला आहे. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक साईनाथ पुयड, महेश कोरे, मारोती चव्हाण यांची सुध्दा उपस्थिती होती. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील भाग्यनगर पोलीस ठाण्यातील चार, विमानतळ पोलीस ठाण्यातील दोन, भोकर पोलीस ठाण्यातील एक, शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोन, वसमत जि.हिंगोली येथील एक, मुधोळ, बासर, तानुर आणि बोधन जि.निर्मल (तेलंगणा) येथील चार जागी चैनस्नेचिंग करणारे सात आरोपी पोलीसंानी पकडले. पकडलेल्या आरोपींची नावे आमन उर्फ आम्या किशोर जोगदंड (21) रा.राहुल उर्फ हिपॉप माणिका लिंगायत (23), मोहम्मद आफताफ उर्फ आदु अब्दुल खदीर (21) रा. मुदखेड, शेख मोबीन शेख गौस(25) रा.खुदबेईनगर, संजय उर्फ संजू दत्ता गुंडेवार (30) रा.नंदीग्राम सोसायटी , रोहित नरेंद्र ताटीपाऊलवार(21) रा.चौफाळा नांदेड, राहुल चंद्रकांतराव (25) रा.भोकर अशी आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरी केलेले काही सोन्याचे दागिणे या चोरट्यांनी मुत्थुट फायनान्समध्ये ठेवून कर्ज घेतले आहे. या संदर्भाने बोलतांना पोलीस अधिक्षक म्हणाले की, चोरीचे साहित्य खरेदी करतांना त्याच्या कागदाची तपासणी जनतेने करावी तरच ते साहित्य खरेदी करावे. नाही तर त्या गुन्ह्यात त्यांना सुध्दा आरोपी केले जाणार आहे. या सात चोरट्यांकडून पोलीसांनी एकूण 6 लाख 89 हजार 697 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात सोन्याचे शॉर्ट गंठन, सोन्याच्या बाळ्या, रोख रक्कम, दोन दुचाकी गाड्या, चार गावठी कट्टे असे साहित्य आहे. या कार्यवाहीमध्ये पोलीस अंमलदार मोहन हाके, दारासिंग राठोड, मिलिंद नरबाग, बालाजी कदम, राजू डोंगरे, महेश बडगू, इमरान शेख, प्रमोद जोंधळे, संदीप घोगरे, रितेश कुलथे, श्रीराम दासरे, माधव माने, शेख उमर, अमोल घेवारे, दिपक ओढणे यांनी परिश्रम घेतले. Kanthak Suryatal Post Views: 1,797 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जेव्हा सत्ताधारीच सत्य बोलतो—गडकरींचं विधान आणि त्याचे अर्थ 1 कोटी 85 लाख 37 हजार 754 रुपयंाची फसवणूक करणारे एक महिला व एक पुरूष गुन्हेगार नांदेड पोलीसांनी पकडले